भाजपची सत्ता असलेल्या सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसच्या गटनेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सहकार मंत्री अमित शहा यांचे कौतुक करून अभिनंदनाचा ठराव मांडला. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा पार पडली. ‘एफआरपी’हून अधिक दर देणाऱ्या साखर कारखान्यांना प्राप्तिकरातून सूट देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल काँग्रेसचे गटनेते जितेंद्र पाटील यांनी मांडलेल्या ठरावावर राष्ट्रवादीचे संजीव पाटील यांनी मंजुरी दिली.
चर्चेदरम्यान, जितेंद्र पाटील यांनी साखर कारखान्यांना प्राप्तिकरात सूट देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व सहकारमंत्री अमित शहा यांचा निर्णय ऊस उत्पादकांच्या फायद्याचा आहे, असे म्हणत अभिनंदनाचा ठराव मांडला. तसेच याला सर्व सभागृहाने मंजुरी दिली.
दरम्यान, यावेळी पंचायत समिती सभापतींनाही स्वीय निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली. परंतु ती फेटाळण्यात आली. आटपाडी तालुक्यात शेटफळे येथील ग्रामसेवकावर अपहाराचा आरोप असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार आपणास नसल्याचे सांगत मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यां