1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

मुंबईत शिवसेनेच्या खेळीने काँग्रेस घायाळ

Spread the love

वादाचा परिणाम थेट महाविकास आघाडीवर?

मुंबई : महापालिकेच्या वॉर्ड पुनर्रचना आणि आरक्षण सोडत प्रक्रियेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षात जुंपलीय. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केल्याचा थेट आरोप काँग्रेसनं केलाय. शिवसेनेने सत्तेचा वापर करून आपल्याला सोयीची वॉर्ड पुनर्रचना केल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वीच केला होता. त्यानंतर आरक्षण सोडतीवरूनही तोफ डागत थेट सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचा इशारा दिलाय

मुंबई महापालिकेची निवडणूक जरी पावसाळ्यानंतर होण्याची अधिकतर शक्यता असली तरी निवडणूक आयोगानं निवडणूक प्रक्रियेला सुरूवात केलीय (BMC elections 2022 ) . मुंबईत काॅग्रेसच्या २९ नगरसेवकांपैकी २१ नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा झाल्याने काँग्रेेसमध्ये नाराजी पसरलीय.मुंबईत वॉर्ड आरक्षण सोडतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसलाय.माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा , आसिफ झकेरिया, सुफियान वनु , कमरजहाॅ सिद्दीकी,बब्बू खान या काही महत्वाच्या काँग्रेस नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झालेत. वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षण सोडतीत शिवसेनेनं स्वत:चा फायदा करुन घेत काँग्रेसच्या जागांवर जाणून बुजून मोठे फेरफार केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले आहे. मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.

रवी राजा ( ravi raja ) यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे माजी खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनीही यावरून नाराजी व्यक्त केली. यावर येत्या आठवड्यात मुंबईत चिंतन शिबीर (Congress Chintan Shivir) घेऊन मुंबईतील काँग्रेस नेते चर्चा करणारेत. महाविकास आघाडीत सहभागी या दोन पक्षांमध्ये मुंबई महापालिका निवडणूक रणांगणात येत्या काळात आणखी तीव्र लढाई होण्याची शक्यता आहे. सध्या तरी शिवसेनेच्या खेळीनं काँग्रेस घायाळ झालीय,एवढं मात्र खरं.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अखेर राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवार ठरला

    May 24th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकोल्हापूरकर संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीर...

    JEE Main 2021 चा निकाल घोषित, 18 विद्यार्थ्यांना ...

    September 15th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजेईई मेन 2021 परीक्षेचा निकाल रात्री उशिरा जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत एकूण 44 विद्यार्थ्यांनी 100 ट...

    राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीची पुण्यात शासकीय बै...

    May 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveकास्ट्राईब शिक्षक संघटनेने शिक्षकांच्या विविध मागण्याकडे लक्ष वेधले पुणे: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन ...