नागपूर: उत्तर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ वगळता इतर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या सोयीने प्रभागाची रचना करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आक्षेप टाकण्यात येणार असल्याचे समजते.
शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी प्रभार रचनेत आढावा आणि कार्यकर्त्यांचे मज जाणून घेण्यासाठी गुरुवारी देवडिया काँग्रेस येथे बैठक बोलाविली होती. यात प्रभाग रचनेवर चर्चा करण्यात आली. उत्तर आणि दक्षिण नागपूर मतदारसंघात मुसंडी मारण्याची मोठी संधी असल्याचे यावेळी मत व्यक्त करण्यात आले.
मात्र उर्वरित दक्षिण-पश्चिम, पश्चिम, मध्य आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील फेररचनेवर कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवली. या चारही प्रभागाची रचना भाजपला फायदेशीर ठरणार असल्याचे काहींनी मत व्यक्त केले. प्रभागाच्या सीमा कुणाच्या तरी सांगण्यावरून ठरवण्यात आल्या असल्याची शंकाही अनेकांनी बोलून दाखविली. त्यामुळे विकास ठाकरे यांनी ज्यांना ज्यांना शंक वाटत असेल तर खरचे काही चुकीचे झाले असेल तर आक्षेप नोंदवण्याची सूचना केली.
जो डिजिटील नोंदणी करेल त्याला प्राधान्य
आगामी निवडणुका जिंकण्यासाठी प्रदेश काॅग्रेस कमेटीच्या आदेशानुसार डिजिटल सदस्यता नोंदणी बाबत प्रत्येक बुथवर एक पुरुष एक महिला यांची सदस्यता नोंदणी नागपूर शहरातील नियुक्त चिफ इनरोलर यांच्या मार्फत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर सहा फेब्रुवारीपासून पासून शहरातील सर्वच वार्ड व प्रभागांमध्ये मोठया प्रमाणामध्ये डिजिटल मेम्बरशिप करण्यासाठी शहरातील पदाधिकारी सक्रिय सहभाग दाखवतील व जो जास्तीत जास्त डिजिटल सदस्य नोंदणी करेल त्याला उमेदवारी देताना प्राधान्य दिले जाईल, असेही विकास ठाकरे यांनी सांगितले.
विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन उमेदवार निवडूण आले. दोन उमेदवार अगदी थोडक्या मतांनी पराभूत झालेत. मागील पाच वर्षांपासून जे कार्यकर्ते पक्ष कार्यासाठी धडपडत आहे त्यामुळे हे शक्य झाले. महापालिकेत काँग्रेसला परत झेंडा उभारणीची आता संधी आहे. पाच वर्ष जो पक्षकार्यात सक्रिय होता त्याचाही उमेदवारी देताना प्राधान्याने विचार केला जाईल असेही विकास ठाकरे यांनी यावेळी सांगितले.