1. Coronavirus pandemic live updates: India reports a single-day rise of 253 new Covid cases in India 2. ‘I carry India with me wherever I go’: Google and Alphabet CEO Sundar Pichai 3. Aaftab used Chinese knife to dismember Shraddha's body, chopped her 1. कोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला लाइव्ह अपडेट्स: भारतात एकाच दिवसात 253 नवीन कोविड प्रकरणांची नोंद झाली आहे 2. ‘मी जिथे जातो तिथे भारताला माझ्यासोबत घेऊन जातो’: गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई 3. श्रद्धाच्या शरीराचे तुकडे करण्यासाठी आफताबने चायनीज चाकू वापरला, आधी तिचे हात कापले: सूत्र

काँग्रेस पार्टी आता जळत जहाज आहे डुबत जहाज आहे:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule

नागपूर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टी सेवा करून साजरा करणार असून त्या निमित्याने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर भाजपचा सेवा पंधरवडा हा उपक्रम असेल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी नागपूर येथील प्रेस क्लबमध्ये दिली. या कालावधीत स्वछता, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, दिव्यांगाना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदेर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम होणार असून त्यामध्ये पक्षाचे सर्व पदाधिकारी, मंत्री, खासदार, आमदार असे सर्वजण सक्रिय सहभागी होणार आहेत, असेही ते म्हणाले.

यावेळेस नागपुरातील प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. यावेळेस बोलतांना त्यांनी “आम्हाला काही शरद पवार साहेबांवर व्यक्तीगत आरोप करायचा नाहीया, आम्ही त्या व्यक्तिगत आरोपातले कार्यकर्ते नाही. आम्हाला व्यक्तिगत आरोप करून काही मोठ व्हायचं नाहीय. आमची ती संस्कृती आणि परंपरा ही नाही आहे. आम्ही आमच्या कामातून आमचा पक्ष वाढवतो. जस बारामती मध्ये मी म्हटलं कि घड्याळ बंद करण्याचा कार्यक्रम करू. त्यांनी ते व्यक्तिगत घेतलं. आमचा पक्ष वाढवताना आम्ही घड्याळ बंद करणारच आहे, आमचा पक्ष वाढविणाराच आहे.

तसेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांना देखील टोला लगावला. “काँग्रेस पार्टी आणि भाजप मध्ये खूप फरक आहे. काँग्रेस पार्टी आता जळत जहाज आहे डुबत जहाज आहे.काँग्रेस ने भारतीय जनता पार्टीची बरोबरी करू नये. नाना पाटोले यांनी जो उपक्रम सुरु केला आहे वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाश झोतात राहण्याचा तर काँग्रेस पार्टी जनमाणसात सेवेचे प्रकल्प करून मोठी करता येईल त्यांना”, असेही म्हणाले.

THE FREE MEDIA

THE FREE MEDIA

All Posts

Latest News

Related Post

निवडणुका ‘ओबीसी विरुद्ध ओबीसी’तच; वडेट्ट...

September 13th, 2021 | RAHUL PATIL

राज्यातील नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील होणाऱ्...

तिसरी लाट येणार ना?, मग कोकणातील 24 कोविड सेंटर का ब...

September 2nd, 2021 | RAHUL PATIL

भाजप आमदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. रत्नागिरी येथील २४ कोविड सेंटर बंद करण्यात आले. मा...

महाराष्ट्रातील 488 शासकीय शाळा होणार ‘आदर्श...

September 2nd, 2021 | RAHUL PATIL

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी राज्यातील ४८८ शासकीय शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...