उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुकीत 70 पैकी कॉंग्रेसला किमान 48 जागा मिळतील असा विश्वास या पक्षाचे नेते हरिष रावत यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाचे येथील पुनरागमन निश्चीत झाले असून भाजपला जेमतेम 20 जागा मिळू शकतात असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री पुष्कर धामी हे व्यक्तीगतरित्या त्यांच्या मतदार संघातून विजयी झाले तर भाजपची इभ्रत वाचणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान काल संपले. त्यानंतर त्यांनी आज निवडणुकीतील स्थिती विषयी त्यांनी त्यांची मते व्यक्त केली. त्यात त्यांनी वरील दावा केला.ते म्हणाले की भाजपला येथे 20 जागा मिळणार असल्याने भाजपची प्रतिष्ठा वाचणार आहे त्याबद्दलही मला मुख्यमंत्री धामी यांचे अभिनंदन करायचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. भाजप नेते 2027 च्या विधानसभा निवडणुकीत आमचे चांगले प्रतिस्पर्धी बनतील असे उपरोधिक विधानही त्यांनी केले