वाडी पोलीस स्टेशनमध्ये मनसेची लेखी तक्रार
नागपूर: जिल्ह्यातील हिंगणा तालुकांतर्गत असलेल्या नगर परिषद वाडी येथील कंत्राटी सफाई महिला कामगारासोबत ठेकेदार महेंद्र उके यांनी आर्थिक फसवणूक केल्याची घटना पुढे आली असून आज दि २२ जून रोजी मनसेतर्फे वाडी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मागील 7 वर्षापासून महिला सफाई कर्मचारी म्हणून कंत्राटी पद्धतीवर काम करीत होत्या. टेंडर संपल्यामुळे महिलांना कामावरून काढण्यात आले. त्यामुळे ठेकेदार व नगरपरिषदच्या विरोधात मनसे व सफाई कामगार कंट्रोल वाडी अशोक रेस्टारंटच्या समोर उपोषणाला बसले 16 दिवस उपोषण चालले. महिलांना किमान वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधीत जी रक्कम जमा केली ती रक्कम देण्यात यावी तसेच esic कार्ड 7 वर्षापासून दिले नाही अशा प्रमुख मागण्यासाठी उपोषणाला बसले होते.
उपोषणाच्या 16 व्या दिवशी, मनसे व कामगारांच्या उपोषणस्थळी ठेकेदार महेन्द्र उके आल्यानंतर मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी व जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे, मनसे संघटक दीपक ठाकरे, तालुका अध्यक्ष अनिल पारखी व मनसे पदाधिकारी व कामगार यांच्या उपस्तिथीत समजोता झाला. ठेकेदाराने जे पैसे कमी भरले ते भरेल व दीड महिन्याचे पेमेंट 14 महिलांना देऊ असे सर्वांच्या समोर लेखी दिले. परंतु आज पर्यंत महिला कामगारांना दीड महिन्याचे वेतन मिळाले नाही.
आज दि. २२ जून रोजी ठेकेदाराला फोन केला असता मी पैसे देणार नाही असे स्पष्ट सांगितले. म्हणून मनसे पदाधिकारी व महिला सफाई कामगार यांनी प्रदीप रायनवार पोलीस निरीक्षक वाडी यांच्याकडे लेखी तक्रार केली. लवकरात लवकर ठगबाज महेंद्र उके या ठेकेदारावर धोकाधाडी व आर्थिक फसवणुकीच्या कायद्यानुसार कार्यवाही करून सफाई महिला कामगारांना न्याय द्यावा असे निवेदन वाडी येथील ठाणेदार साहेबांना दिले आहे. यावर योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढचे पाऊल लवकर उचलणार असा इशाराही मनसेनी दिला आहे.
वाडी पोलीस स्टेशन येथे मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत भाऊ गडकरी , जिल्हा अध्यक्ष सतीश भाऊ कोल्हे, मनसे तालुका संघटक दीपक ठाकरे, मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी, शहर उपाध्यक्ष वैभव तुपकर,विक्की वानखेडे, ओंकार तलमले, मुकेश मुंडले, अश्विन कोडापे, संदीप माने, संतोष पाल, नितीन पिठोरे,सूरज भलावी अजिंक्य वाघमारे, विठोबा घुरडे व मनसे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.