देशाच्या विकासामध्ये सहकार क्षेत्राचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करुन विकासासाठी सहकारीतेचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, ”देशाच्या विकासामध्ये सहकारीतेचा महत्त्वाचा वाटा आहे. सहकार आंदोलनाची कोणती योग्य वेळ असेल तर ती आताची आहे. सहकारीता म्हणजे सह आणि कार्य. सहकारी आंदोलन देशातील ग्रामीण भागाचा नव्याने विकासही करेल. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये सहकारी क्षेत्राचा वाटा वाढविण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कार्य केले पाहिजे. 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी सहकार क्षेत्र महत्त्वाचा वाटा उचलेल सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असू शकते मात्र मानवी एकतेची ताकद मोठी आहे.”
‘आम्हाला न्याय द्या’ राकेश टिकैत यांची थेट जो बायडन यांना साद
मी यावेळी सहकार क्षेत्राला योगदान देणाऱ्या नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो, असही देशाचे गृहमंत्री यावेळी म्हणाले. सहकार क्षेत्राची आर्थिक ताकद कमी असू शकते मात्र मानवी एकतेची ताकद मोठी आहे.
सहकाराचे महत्त्व
🔹देशाच्या विकासात सहकाराचा मोठा वाटा आहे.
🔹सहकारी हा शब्द ‘सह आणि कार्य’ यांनी बनला आहे.
🔹सहकारी आंदोलनाची योग्य वेळ आत्ता आली आहे
🔹सहकारी आंदोलन आपल्या देशाला पुढे घेऊन जाईल.
🔹5 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी मोठा हातभार सहकार क्षेत्र लावेल.
🔹सहकारी चळवळ मानवी एकतेची सर्वात मोठी ताकत.
🔹देशातील सहकारी आंदोलन देशाच्या उभारीमध्ये हातभार लावते.
🔹सहकार क्षेत्र आणि भारतीय अर्थव्यवस्था एकमेंकावर अवलंबून आहे.