1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

उत्तर कोरियात कोरोना; सहा जणांचा मृत्यू

North Korea -thefreemedia
Spread the love

1 लाख 87 हजारांहून अधिक लोक क्वारंटाईन

प्योंगप्यांग – कोरोनाचा फैलाव उत्तर कोरियात झालेला असतानाच सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उत्तर कोरियामधील सरकारी मीडियाने दिली आहे. गुरुवारी पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याची उत्तर कोरियाने जाहीर कबुली दिल्यानंतर सहा जणांच्या मृत्यूमुळे चिंता वाढली आहे.

यासंदर्भात KCNA ने दिलेल्या वृत्तानुसार, देशात एप्रिल महिन्यात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यानंतर सध्या 1 लाख 87 हजार 800 लोकांना क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 3 लाख 50 हजार लोकांमध्ये लक्षणे दिसली असून यातील 1 लाख 62 हजार 200 लोकांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. सहापैकी मृत्यू झालेल्या एकाला ओमिक्रॉनची लागण झाली होती.

उत्तर कोरियाने देशात आणीबाणी जाहीर केली असून अनेक शहरांमध्ये लॉकडाउन लावण्यात आला आहे. हुकूमशाह किम जोंग उन याने मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट देत आढावा घेतला. कोरोनाची सुरुवात झाली तेव्हाच दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय सीमा बंद केल्यापासून देशात करोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याचा दावा याआधी उत्तर कोरियाने केला होता. विशेष म्हणजे 2.5 कोटी लोकसंख्या असलेल्या उत्तर कोरियात एकही व्यक्तीचे लसीकरण झालेले नाही. तसेच देशातील आरोग्यव्यवस्था कोरोनाशी दोन हात करण्याएवढी सक्षमदेखील नाही.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जागतिक टपाल दिनी शिवराज मोरेंचे मोदींना पत्र; ‘...

    October 9th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveआज जागतिक टपाल दिनानिमित्त आपल्याला जाहीर पत्राच्या माध्यमातून मोदीजी आपणास हे विचारतोय. जनता तुमच्याकडे आश...

    कृषी क्षेत्रात सहकार्य वाढवण्यास उझबेकिस्तान आणि भार...

    July 30th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनवी दिल्‍ली: उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजाव आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद...

    इस्रायलचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर!

    March 21st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveइस्रायलच्या पीएमओ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ” पंतप्रधान मोदी यांच्या निमंत्रणावरून भारताला पहिली अध...