कोरोनाची परिथिती थोडीफार नियंत्रणात अली असून अनेक राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या दररोज ताप तपासणीच्या सूचना देखील आल्या आहेत. मात्र आयसीएमआरच्या संशोधकांनी एका रिसर्च स्टडीनुसार ताप तपासणी ऐवजी कोरोना चाचण्या शाळांमध्ये कराव्यात अशी शिफारस केली आहे.
आयसीएमआरशी संबंधित असलेल्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रेसेर्चमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या संशोधनात शाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यात यावी असे सांगितले गेले आहे. कोरोना व्हायरसच्या प्रसाराच्या संभाव्य धोका लक्षात घेता शाळांमध्ये स्क्रीनिंग ऐवजी कोविड चाचण्या करण्याचे धोरण महत्त्वाचं ठरू शकतं. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा, समीरण पांडा आमि तनू आनंद यांनी हा शोधनिबंध लिहिला आहे.
‘शाळांमध्ये कोरोना चाचण्याचं धोरण एक सहाय्यभूत म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे’, असंही यात म्हटलं आहे. ‘शाळांमध्ये नियमित तापमान व अन्य लक्षणांची तपासणी करणं टाळलं पाहिजे. कारण त्यांच्या वापराबद्दल पुरावे खूप मर्यादित आहेत. देशातील सध्याच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे शाळांमध्ये चाचण्या करण्याची सुविधा असायला हवी, अशी शिफारस करत आहोत’, असं या संशोधनात म्हटलं आहे.’
लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नव्हती. तर माध्यमिक विद्यालये पुन्हा सुरू केल्यानंतर रुग्णसंख्या वाढल्याचं समोर आलं आहे. कारण विद्यार्थी कुटुंबातील लोकांनाही संसर्ग झालेला होता. दरम्यान, आयर्लंडमधील एका शाळेत पुन्हा संसर्ग झाल्याचं दिसून आले आहे, असेही यात म्हटले आहे.