तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये दहशत पसरवली आहे. यासाठी अफगाणिस्तानमधून नागरिकांना भारतात आणण्यात येतंय. यावेळी काल 78 नागरिकांना भारतात आणण्यात आलंय. यामध्ये 78 जणांपैकी 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर भारतात आलेल्या सर्व नागरिकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलं आहे.
प्राप्त माहितीनुसार, ज्या 16 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांच्यामध्ये कोणतीही कोरोनाची लक्षणं दिसून आलेली नाहीत. काबुलमधून गुरुग्रंथ साहिबचे तीन ग्रंथी देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. या नागरिकांचा कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतर सर्व 78 लोकांचा तातडीने क्वारंटाईन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि अन्य नेते तसंच अधिकारी यांच्या संपर्कात आले असल्याची माहिती आहे.
भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे अफगाणिस्तानमधील काबूलमधून लोकांना आणण्यात येत आहे. यामध्ये भारतीय नागरिकांबरोबरच अफगाण नागरिकांचाही समावेश आहे. 78 लोकांना आणण्यात आलं होतं.
भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानातून 500 हून अधिक लोकांना सुरक्षित आणलं आहे. त्याचबरोबर दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधीच काबूलहून परत आणण्यात आलं आहे. भारत दररोज दोन विमानांमध्ये लोकांना आणण्यात येत आहे. अफगाणिस्तानातून परत आणलेल्या लोकांबाबतही सावधगिरी बाळगली जातेय. कोरोनाचं संकट पाहता, लोकांना क्वारंटाईन ठेवून त्यांची चाचणीही केली जातेय. भारताने या अभियानाला ऑपरेशन देवीशक्ती असे नाव दिलं आहे.