नौकरीवर गदा येईल या भीतीने गुपचूप फाईलचे सबमिशन
नागपूर: महानगर पालिकेच्या स्लम विभागाच्या चोरट्या अधिकाऱ्यांनी तसेच गांधीबाग झोन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मिळून पैसे घेवून फाईल गायब केल्याच्या संदर्भात दिनांक १२/०३/२०२२ रोजी घेतलेल्या पत्रपरिषदे नंतर नौकरी वर गदा येईल या उद्देशाने मनपा कार्यालयात फाईल गुपचूप फाईल जमा केली. यासंदर्भात दि ०६ एप्रिल रोजी पत्रपरिषदेत एडवोकेट नितेश बारापात्रे यांनी NMC मध्ये पुन्हा ऑफिसमध्ये फाईल कशी आली तसेच महानगरपालिकेच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात माहिती दिली.
दिनांक १२/०३/२०२२ रोजी टिळक पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदे नंतर संपुर्ण माहीती न्युज पेपर न्युज चॅनल च्या माध्यमाने जनते पर्यंत प्रसारित करण्यात आली त्याच्या परिणाम म्हणुन नागपूर महानगर पालिकेच्या स्लम विभागातील तसेच नागपूर महानगर पालिकेच्या गांधीबाग झोन मधील ज्या चोरटया अधिकाऱ्यानी EVEREST PLAZA गांजाखेत चौक, नांदबाची डोब चुनाभट्टी नागपूर वार्ड नंबर. ४७ कार्पोरेशन घर नंबर ८३ आणि ८४ ची फाईल गायब / गहाळ करण्याचे काम केले होते त्या चोरट्या अधिकाऱ्यानी नौकरी वर गदा येईल या उद्देशाने फाईल रेकॉर्ड मध्ये आणून जमा केलेली आहे .
दि.20 रोजी नागपुर महानगर पालिकेच्या स्लम विभागाला, गांधीबाग झोनला तसेच अन्य विभागाला पाठवलेली होती त्यानंतर सतत ५ REQUISITION अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबान कडुन नागपुर महानगर पालिकेच्या स्लम विभागाला व पाठविण्यात आलेली आहे. तरी सुध्दा नागपुर महानगर पालिके कडुन आजपर्यंत फाईल / रेकॉर्ड गांधीबाग झोन तसेच अन्य झोन ला पाठविण्यात आलेली नाही. मी वारंवार नागपुर महानगर पालिकेच्या स्लम विभागाला तसेच गांधीबाग झोन ला गेलो असता नागपुर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्या कडुन पैसे घेवून फाईल गायब / गहाळ केल्या गेल्याचे कृत्य उघडकीस आले. व सत्य स्थिती पाहाता नागपुर महानगर पालिकेतील स्लम विभागातील अधिकाऱ्यांच्या मागील किती तरी वर्षापासुन असा हा फाईल/रेकॉर्ड गायब करण्याच्या व्यवसाय चालत आलेला आहे. स्लम विभागातील अधिकारी अश्या या स्लम केसेस मध्ये डायरेक्ट बिल्डर यांना approached होतात व त्यांच्याकडुन पैसे घेवुन फाईल गायब / गहाळ करण्याचे काम नागपुर महानगर पालिकेच्या अधिकाऱ्याकडुन केले जातात व यांच्या उद्देश्य असा आहे कि न्यायलयिन प्रक्रिया मध्ये विलंबता निर्माण करणे हा आहे असे बारापात्रे यांनी सांगितले.