कोरोना महामारीशी लढण्यासाठी देशभरातून निधी जमा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पीएम केअर फंड संकेतस्थळातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव हटवा, तसेच देशाचे बोधचिन्ह आणि राष्ट्रध्वज काढण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे. मुबंई हायकोर्टाने या याचिकेची दखल घेऊन केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या याचिकेवर सरकारला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.
ठाण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते विक्रांत चव्हाण यांनी याचिका दाखल केली असून खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती एस. जी. दिगे यांनी यावर आदेश दिला.
याचिकाकर्ते विक्रांत चव्हाण यांनी या चॅरिटी ट्रस्टमधून पंतप्रधान मदत व पुनर्वसन निधी न्यासाच्या नावातून ‘पंतप्रधान’ शब्द काढून टाकण्याचे आदेश केंद्र सरकारला देण्याची मागणी केली आहे.