४७ वर्षीय नरोन्हा, भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक
भारतभर डिमार्ट रिटेल स्टोअर्स चालवणाऱ्या अॅव्हेन्यू सुपरमार्केट्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इग्नाटियस नविल नरोन्हा यांच्या संपत्तीत एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली आहे. कारण डीमार्ट रिटेल फर्मच्या शेअर्समध्ये यावर्षी ११३ टक्क्यांनी आश्चर्यकारक वाढ झाली आहे. बीएसई वर आजच्या ट्रेडिंग मध्ये, या स्टॉकने इंट्रा डे मध्ये ५,८९९ रुपयांच्या नवीन विक्रमाला स्पर्श केला आहे आणि मार्केट कॅपने ३.५४ लाख कोटी रुपयांची पातळी ओलांडली आहे.
गेल्या सात सत्रांपासून शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि ही वाढ ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. यासह, ४७ वर्षीय नरोन्हा, भारताचे सर्वात श्रीमंत व्यावसायिक व्यवस्थापक बनले आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही ७,७४४ कोटी झाली आहे. सध्या, कंपनीमध्ये नरोन्हा यांचे १३.१३ दशलक्ष शेअर्स म्हणजेच २.०३ टक्के इतके भागभांडवल आहे.
अॅव्हेन्यू सुपर मार्केटच्या शेअर्समध्ये १९ पट वाढ झाल्याने त्याच्या संपत्तीमध्ये झाली आहे. हा स्टॉक २१ मार्च २०१७ रोजी बाजारात सूचीबद्ध झाला. त्याची इश्यू किंमत २९९ रुपये होती. तेव्हापासून, या स्टॉकमध्ये १८०० टक्के वाढ झाली आहे. मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या नरोन्हा यांनी नर्सी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमधून व्यवस्थापनाची पदवी घेतली आहे.