आज दि. २ सप्टेंबर रोजी नागपूर महानगरपालिका सत्तापक्ष कार्यालयात सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची पत्रकार परिषद दुपारी ४.३० च्या सुमारास पार पडली. त्यात त्यांनी विविध राबविलेले प्रकल्प, मनपा निवडणूक, शहर विकासाची कामे याविषयी ते बोलले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर आरोप देखील लावले.
वर्ष २०१४ ला महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यानंतर नागपूर शहराचा अत्यंत वेगाने विकास झाला. शहरात सिमेंटचे रस्ते, बगीचे ५७२ व १९०० ले आऊटमधील नागरी सुविधाची विकास कामे वेगाने सुरु झाली व नागरी शहराचा चेहेरा मोहरा बदलू लागला. याकरिता सरकारकडून हजारो करोडो रुपये देखील अनुदाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत होते, त्यामधून नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत होत्या. पण २०१९ ला राज्यात सत्ता परिवर्तन झाले व राज्य सरकार कडून सूडबुद्धीने राजकारण सुरु झाले. प्रशासनाचा वापर करून नागपूर शहराची विकास कामे थांबविण्यात आली, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी नागपूर शहरातील प्रमुख रस्त्याविषयी ते बोलले. राज्य सरकारने निधी मंजूर केले होता. पण नवीन सरकारने तो थांबविल्याबरोबेर त्याला ब्रेक लागला. एकूण १२० करोड रुपयात, ५७ करोड रुपये महानगरपालिकेचे होते, शासनाचे ३५ करोड आणि एनआयटीचे ३५ करोड रुपये अजून मिळायचे असल्याचेही ते बोलले.
डाँबरीकरण रस्त्याना गेल्या दोन वर्षात फक्त नगरसेवकांच्या प्रायॉरीटी (प्राधान्यानुसार) त्यांना मंजुरी दिली होती. यात पंधरा लाखांचे अंतर्गत रस्ते सामील होते आणि आयुक्तांनी मंजुरी न दिल्यामुळे डांबरीकरणाचे जास्तीत जास्त काम थांबले असे ते म्हणाले.
“आमचा आरोप असा आहे कि एकीकडे राज्य सरकार अनुदान देत नाही, निधी देत नाही. महानगरपालिकेचा जो निधी आहे त्यातून जी विकास काम करायची त्याला आयुक्त मंजुरी देत नाही आणि काँग्रेस नेते महानगरपालिकेवर आरोप करतात,अशी दुहेरी नीती सुरु आहे. काँग्रेसच्या हस्तक्षेपामुळे महानगरपालिका विकास काम खोळंबली आहे” असं सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणालेत.
नागपूर शहराचा विकास थांबला राज्य सरकारने अनुदान थांबविले म्हणून जनता मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली असं सत्ता पक्ष नेते अविनाश ठाकरे म्हणालेत.
तसेच नागपुरातील मनीषनगर अंडरपास विषयी सीसीटीव्ही, आणि सुरक्षा निकष विषयी त्यांनी स्वतः पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन दिल्याचे ते म्हणाले तसेच याविषयी मेट्रोलाही सांगितले आहे असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत जिंकून आल्यास शहरात नवीन प्रकल्प राबवू, विकास काम करू, तलाव तसेच नाग नदी पुनरुज्जीवन करू असे त्यांनी ‘द फ्री मीडियाला’ सांगितले.