हिंगणघाट: स्थानिक रोटरी क्लब व एरीस अॅग्रो यांचे संयुक्त विद्यमाने तावी, केसलापार, रावी रासा या भीषण पाणी टंचाई असणार्या गावातील लोकांना वाटर वेलो टँकचे मोफत वाटप करण्यात आले. सदरील गावात पिण्याच्या पाण्याकरीता महिलांना दूरवरुन डोक्यावर घागर घेऊन पाणी भरावे लागत असल्याचे निदर्शनास आले असता, त्या गावात काही मदत करता येईल का या विचाराने प्रेरीत होऊन रोटरी क्लबने कोचर बियाने यांचे मध्यमातून एरीस अॅग्रो या कंपनीशी चर्चा करून त्यांच्या साैजन्याने 20 वाॅटर वेलो टाँकचे नुकतेच वितरण करण्यात आले.
गावातील सरपंच विलास नवघरे यांनी पाणी टंचाईची कैफीयत रोटरी क्लब जवळ मांडली होती. ती पूर्ण झाल्याने त्यांनी समाधान त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाकरीता एरीस अॅग्रो कंपनीचे झोनल मॅनेजर रुपेशजी गावांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार प्रामुख्याने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला पराग कोचर, उद्योजक संजय अग्रवाल निलेश नव्हाते, दिनेश वर्मा उपस्थित होते. झोनल मॅनेजर गावंडे यांनी या टॅंक ची उपयोगिता कशी होईल तसेच यापुढेही आमचे कंपनीकडून मदत देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले, प्रा.जितेंद्र केदार यांनी सांगितले की, दिवसेंदिवस जमिनितील पाण्याची पातळी कमी होत आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न भिषन होत चाललेला आहे,ती वाढवण्यासाठी मानवाला प्रयत्न करणे आवश्यक आहे. पातळी कमी होण्याला आपणच जबाबदार आहो त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविण्यासाठी प्रत्येक मानव प्राण्याला प्रयत्न करणे जरुरी आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अशोक बोंगिरवार यांनी केले तर आभार केदार जोगळेकर यांनी मानले.