1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

रोटरी क्लबतर्बे पाणी टंचाईच्या गावात वाॅटर वेलोचे वितरण

Spread the love

हिंगणघाट: स्थानिक रोटरी क्लब व एरीस अॅग्रो यांचे संयुक्त विद्यमाने तावी, केसलापार, रावी रासा या भीषण पाणी टंचाई असणार्‍या गावातील लोकांना वाटर वेलो टँकचे मोफत वाटप करण्यात आले. सदरील गावात पिण्याच्या पाण्याकरीता महिलांना दूरवरुन डोक्यावर घागर घेऊन पाणी भरावे लागत असल्याचे निदर्शनास आले असता, त्या गावात काही मदत करता येईल का या विचाराने प्रेरीत होऊन रोटरी क्लबने कोचर बियाने यांचे मध्यमातून एरीस अॅग्रो या कंपनीशी चर्चा करून त्यांच्या साैजन्याने 20 वाॅटर वेलो टाँकचे नुकतेच वितरण करण्यात आले.

गावातील सरपंच विलास नवघरे यांनी पाणी टंचाईची कैफीयत रोटरी क्लब जवळ मांडली होती. ती पूर्ण झाल्याने त्यांनी समाधान त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाकरीता एरीस अॅग्रो कंपनीचे झोनल मॅनेजर रुपेशजी गावांडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र केदार प्रामुख्याने उपस्थित होते.

या कार्यक्रमाला पराग कोचर, उद्योजक संजय अग्रवाल निलेश नव्हाते, दिनेश वर्मा उपस्थित होते. झोनल मॅनेजर गावंडे यांनी या टॅंक ची उपयोगिता कशी होईल तसेच यापुढेही आमचे कंपनीकडून मदत देण्याचा प्रयत्न करु असे सांगितले, प्रा.जितेंद्र केदार यांनी सांगितले की, दिवसेंदिवस जमिनितील पाण्याची पातळी कमी होत आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्न भिषन होत चाललेला आहे,ती वाढवण्यासाठी मानवाला प्रयत्न करणे आवश्यक आहे. पातळी कमी होण्याला आपणच जबाबदार आहो त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम राबविण्यासाठी प्रत्येक मानव प्राण्याला प्रयत्न करणे जरुरी आहे. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अशोक बोंगिरवार यांनी केले तर आभार केदार जोगळेकर यांनी मानले.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    मुलींच्या शासकीय निवासी शाळेस शिक्षण व बाल कल्याण सभ...

    April 1st, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर: जिल्हा परीषद अंतर्गत हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय मुलींची निव...

    नागपूर मनपात ”वरून कीर्तन अन् आतून तमाशा”

    June 2nd, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveनागपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीमुळे काँग्रेस भाजप पक्ष हैराण नागपूर :- आगामी मनपा निवडणुकीच्या तोंड...

    ‘खरा तो एकची धर्म’ मधून सर्वांना आपले म्हणून वागणूक ...

    December 25th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveसाने गुरूजी जयंती निमित्त कार्यक्रम नागपूर: लहानपणापासून साने गुरूजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना आपण...