नागपूर:११ मार्च पासून नागपुरातील दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र येथे सुरु झालेल्या येथे दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मार्च 2022 रोजी दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र, नागपूर आयोजित “28 व्या ऑरेंज सिटी क्राफ्ट फेअर अँड फोक डान्स फेस्टिव्हल” मध्ये कार्यक्रमाची सुरुवात केली.
अधिवक्ता गौरी चंद्रायन, नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, गौरी मराठे, उपसंचालक, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, श्रद्धा जोशी आणि डॉ.संगीता टेकाडे,SVK शैक्षणिक संस्थेच्या फाऊंडर गायत्री वात्सल्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
16 मार्च 2022 रोजी फॅशन शोमध्ये SVK शैक्षणिक संस्थेच्या दिव्यांगांनी कार्यक्रमाचे पहिले सादरीकरण केले. या फॅशन शोमध्ये दिव्यांगांनी आपला परफॉर्मन्स दिला. यामध्ये या दिव्यांगांनी टाय आणि डाई तंत्राचा वापर करून तयार केलेला दुपट्टा आणि खादीचे कुर्ते परिधान करून आपले सादरीकरण केले. या सादरीकरणाला सर्व श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.
SVK शैक्षणिक संस्थेच्या दिव्यांगांनी एकामागून एक येत डोळ्याला आनंद देणारे वस्त्र परिधान करून सभोवताल पार्श्व संगीत सुरु असताना अतिशय उत्तमरित्या रॅम्प शो केला. त्यात त्यांचा उत्साह आणि आनंद दिसून येत होता. SVK शैक्षणिक संस्थेच्या फाऊंडर गायत्री वात्सल्य यांनी नंतर प्रत्येक मुलाने केलेल्या सादरीकरणाचे स्पष्टीकरण दिले. निशा वर्मा या मुलीने सर्वांचे धन्यवाद म्हणत भाषण दिले. श्रेयस यांनी गाणे म्हटले. निखिल गोखले यांनी डायलॉग म्हटले. शेफाली कोहाट या मुलीने देखील सुंदर गाणे म्हणून सगळ्यांचे मन जिंकले.