राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या आणि अखेर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव निश्चित झाले आहे आणि यावरूनच आता, अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शूर्पणखा’ बसवू नका, असा जोरदार वार भाजपच्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच नाव न घेता खोचक टीका केली आहे. आज त्याच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. पण आज १४ ऑक्टोबर रोजी चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून रुपाली चाकणकर यांच्यावर घणाघाती वार केला आहे.
महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा हल्ला चढवत जर चाकणकर यांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचे नाक कापले जाईल, असा सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये चाकणकर यांचं नाव घेतले नाही. पण रात्रीपासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकर यांची निवड निश्चित झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे जरी चित्रा वाघ यांनी नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख चाकणकरांकडे आहे, हे स्पष्ट आहे.
अनेकवेळा चित्रा वाघ आणि चाकणकर यांच्यात वादाचे चक्र सुरु असते. आता महिला आयोगाच्या अधिकृत घोषणा अगोदर चित्रा वाघ यांनी चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. याच्यामुळे पुढे आणखी वाद वाढणायची शक्यता दिसते आहे.