नॅशनल केमिस्ट्री वीक (NCW) ही एक जनजागृती मोहीम असून जी दैनंदिन जीवनात रसायनशास्त्राचे मूल्य वाढवते. ACS सदस्य आणि रसायनशास्त्र उत्साही कार्यक्रमांचे समन्वय साधून आणि रसायनशास्त्राचे महत्त्व सांगून NCW साजरा करतात. राष्ट्रीय रसायनशास्त्र सप्ताह स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर रसायनशास्त्राच्या सकारात्मक प्रभावांबद्दल जागरूकता निर्माण करतो. यावर्षी हा कार्यक्रम 17 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर पासून मोठ्या उत्साह्याने साजरा करण्यात आला. नॅशनल केमिस्ट्री विक 2021 ची थीम फास्ट किंवा स्लो chemistry makes it go होती.
ACS इंटरनॅशनल स्टुडंट चॅप्टर, डॉ.आंबेडकर कॉलेजने सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, मुंबई यांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील मौखिक सादरीकरण आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून नॅशनल केमिस्ट्री विक 21 साजरा केला. या कार्यक्रमाचे परीक्षक डॉ. संतोष डी.देवसरकर, Director, रसायनशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड, मुंबईचे डॉ.विशाल बानेवार, सहयोगी रसायनशास्त्र विभाग, विज्ञान संस्था, होते. डॉ.रमेश एन. झाडे आणि डॉ.सूरज ए. पुरंदरे सहयोगी प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मुंबई. डॉ.नंदकिशोर चंदन, रसायनशास्त्र विभागाचे उपप्राचार्य आणि प्रमुख, सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मुंबई आणि प्रा.डॉ.दीपा पान्हेकर, एचओडी केमिस्ट्री, नागपूर आणि फॅकल्टी अडव्हायझर, एसीएस चॅप्टर डीएसीएन हे समन्वयक यांनी स्वागत केले तर डॉ.नंदकिशोर चंदन यांनी आभार मानले.
सादरीकरण स्पर्धेतील विजेते:
प्रथम क्रमांकः गुप्ता, डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, मुंबई.
द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे डॉ.आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील अक्षत हटवार व सायली चक्रे यांनी पटकावला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेते:
- सौम्या पटेल, कुचिंदा कॉलेज, कुचिंदा, ओडिशा
- प्रयती चुनाटकर, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती
3.अनिताकुमारी श्रीवास्तव, रसायनशास्त्र विभाग, आरटीएम
नागपूर विद्यापीठ विजेत्यांना बक्षीस रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. प्रा.डॉ.अशोक सुनतकरी, प्राचार्य, सिद्धार्थ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मुंबई आणि प्रा.डॉ.बी.ए.मेहेरे, प्राचार्य, डॉ.आंबेडकर महाविद्यालय, नागपूर यांनी विजेत्यांचे व आयोजक संघाचे अभिनंदन केले. ACS विद्यार्थी अध्याय सदस्य, हिमांशू धावडे, अंकिता पटेल, जान्हवी गावंडे, रितू पटले, जानकी परवाडिया, वृषाली खडतकर, इंद्रक्षी सुरपाटणे, हिमांशू बाथव आणि सिद्धार्थ कॉलेज, मुंबईचे विद्यार्थी, कार्यक्रम ला यशस्वीरित्या सोनाली चौधरी व स्मरिका शिर्के, कर्मचारी सदस्य डॉ.आर.सी.सावंत, पराग पानसे, कु.रश्मी मोकल, कु.तृप्ती सावंत उपस्थितीत राहून परिश्रम घेतलेत. डॉ.प्रा.दिपा पान्हेकर आणि प्रमुख, पीजी समन्वयक आणि संशोधन केंद्र प्रमुख, रसायनशास्त्र विद्याशाखा सल्लागार विभाग, अमेरिकन केमिकल सोसायटी इंटरनॅशनल स्टुडंट चॅप्टर, डॉ.आंबेडकर कॉलेज, दीक्षाभूमी, नागपूर याप्रसंगी उपस्थित होते