1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्यसंगीत परिषदेच्या अध्यक्षपदी डॅा.मधुसूदन घाणेकर

Spread the love

सा इंटरनॅशनल,भारता तर्फे शनिवार दि.५ मार्च २०२२ रोजी पहिली आंतरराष्ट्रीय ऑनलाइन वाद्य संगीत परिषद घेण्यात येणार असून
सदर परिषदेच्या अध्यक्षपदी विश्वविख्यात शीळवादक, विश्वविक्रमी
कलावंत डॅा.मधुसूदन घाणेकर यांची
निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य निमंत्रक आणि सुप्रसिद्ध गिटारवादक यशवंत गरड तसेच सहनिमंत्रक आणि वर्ल्ड व्हिजनचे अध्यक्ष प्रा. नागेश हुलावळे (मुंबई)यांनी कळवली आहे.

ज्येष्ठ संगीत अभ्यासक कृष्णकांत चेके यांच्या शुभहस्ते उदघाटन होणार आहे. एकेका वाद्यावर
एकेक कलावंत चित्रपट गीतांचा आविष्कार सादर करणार असून काही वाद्यांविषयी देखिल वैशिष्ट्य पूर्ण माहिती तसेच वाद्यांविषयक
काव्य सादरीकरण आदि कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

भारत बेल्जियम मैत्रीसंघाचे यश दबडे,
प्रीति दबडे तसेच युएसए मधील
मास्टर आर्यन धनेश्वर, नेदरलॅंडस मधील
डॅा.मानसी मोहरिल आणि ॲड.प्रणिता देशपांडे तसेच ऋचा थत्ते, स्वप्नील लगाडे, रोहित लगाडे, विश्वास धोंगडे,तन्मयी भिडे, संजय भिडे,शशांक साठे,धनंजय अनगळ,विवेक म्हसवडे , प्रतिमा काळे, देवराज पवार, आदि कलावंत या परिषदेत सहभागी होणार आहेत. समारोपात
डॅा.घाणेकर यांच्या शुभहस्ते कलावंतांना सा इंटरनॅशनल पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे.

Claim Free Bets

डॅा.मधुसूदन घाणेकर यांच्या नावावर शीळवादन, गायन, लघुपट, अनुबोधपट आदि विषयक अनेक विश्वविक्रम असून सुमारे 150 राष्ट्रीय आंतराष्ट्रीय परिषदा-साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले आहे.

भारतासह 17 देशात त्यांचे शीळवादनाचे 10,000 हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा यादे तसेच सबकुछ,मधुसूदन ह्या एकपात्री कार्यक्रमाचे हजारो प्रयोग देशविदेशातून झाले आहेत.

यशवंत गरड,मुख्य निमंत्रक
मो.9595250210

डॅा.मधुसूदन घाणेकर,परिषद अध्यक्ष
मो.9422035136

    Avatar

    Ankita Deshkar

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अफगाणिस्थानमध्ये भूकंप बळींची संख्या ९०० वर, ६२० जखमी

    June 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनागपूर: तीव्र भूकंपाच्‍या धक्‍क्‍याने आज सकाळी अफगाणिस्‍तान हादरले. रिश्‍...

    चंद्रावर पडणार पुन्हा भारतीय पाऊल, नासाने मून मिशनसा...

    December 8th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा समावेश अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने नव्या चंद्र मोहिमेसाठी (मून मिशनसाठी) १...

    महान फलंदाज व इंग्लंडचे माजी कर्णधार टेड डक्स्टर यां...

    August 26th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveइंग्लंडचे माजी कसोटी कर्णधार टेड डेक्सटर यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला....