नागपूर: हवेत उडणारी बस नागपुरात चालविण्याचं माझं स्वप्न आहे. त्याची तयारी सुरू करा मी त्यासाठी पैसे आणतो. त्याचं मंत्रालय माझ्याकडे आहे, असंही गडकरी म्हणाले. ते आज नागपुरात महापालीकेतील कार्यक्रमात बोलत होते.
नगरसेवकांचा आज महापालिकेतील शेवटचा दिवस आहे. मात्र पुन्हा आपल्याला यायचं आहे. राजनीती बुलेट ट्रेनप्रमाणे आहे. लोकांची गर्दी होते आणि ती खाली होते पुन्हा भरते. हेच लोक पुन्हा निवडून आले तर जे आमच्या घरी चकरा मारत आहे त्यांचं काय होणार? त्यांना तिकीट कसं मिळणार, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पण सगळ्यांनी चांगलं काम केलं. त्यांना शुभेच्छा. मी लोकसभेत बोलताना उभं होतो. तेव्हा सगळ्या पार्टीचे लोकं मला अभिनंदन करतात. मी त्यांना गमतीत म्हणतो. माझी श्रद्धांजली सभा आहे का? तुमचं काम चांगलं असेल तर सगळे तुमच्या सोबत असतात.
सरकारमध्ये चांगल्या कामाला सन्मान मिळत नाही. आणि वाईट काम करणाऱ्याला सजा मिळत नाही. इथे सगळे बरोबरच असते. तुम्हाला तिकीट मिळणार की नाही हे मी सांगू शकत नाही. कारण मी तिकीट देत नाही. मी सर्व्ह करतो ज्याला जनता म्हणेल त्याला तिकीट दिली जाते, असंही त्यांनी सांगितलं
नगरसेवकांचं काम सगळ्यात कठीण
नगरसेवकांचा काम सगळ्यात कठीण असते. कारण प्रत्येक जण आपलं काम त्यांच्याकडे घेऊन जातात. सगळ्यांनी केलेल्या कामाला शुभेच्छा देतो. देवाला प्रार्थना करतो की तुम्हाला पुन्हा तिकीट मिळो. सत्यनारायण नुवाल यांनी खूप मोठं काम देशासाठी केलं. नागपूरची मेट्रो जगातील उदाहरण देणारी मेट्रो आहे. पुण्यात सुद्धा चांगली मेट्रो उभारण्यात आली. शहर बस सेवा मेट्रोने चालवावी असा प्रयत्न सुरू आहे, असंही गडकरी यांनी सांगितलं.