देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाली आहे. काल दिवसभरात देशात 2 लाख 35 हजार 532 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 871 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील दैनंदिन कोरोना सकारात्मकता दर आता 13.39 टक्क्यांवर आला आहे. विशेष म्हणजे आज कालपेक्षा कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. कालच्या तुलनेत देशात 15 हजार 677 कोरोनाबाधित कमी झाले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 20 लाख 4 हजार 333 वर आली आहे. तसेच या महामारीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 93 हजार 198 झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, काल तीन लाख 35 हजार 939 लोक बरे झाले, त्यानंतर आतापर्यंत 3 कोटी 83 लाख 60 हजार 710 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
दरम्यान देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 165 कोटींहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 56 लाख 72 हजार 766 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 165 कोटी 4 लाख 87 हजार 260 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.