देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही दिवसांपासून घट असल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात देशात 50 हजार 407 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 804 बाधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा कालपेक्षा कमी आहे. देशात काल 58 हजार 77 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, तर 657 जणांचा मृत्यू झाला होता. काल दिवसभरात देशात एक लाख 36 हजार 962 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 एवढी झाली आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 3.48 वर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 10 हजार 443 वर आली आहे. तर कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 एवढी झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
त्याचबरोबर देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत, आतापर्यंत सुमारे 172 कोटी कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 46 लाख 82 हजार 662 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत लसीचे 172 कोटी 29 लाख 47 हजार 688 डोस देण्यात आले आहेत.