मणिपूरमध्ये आज सकाळी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.8 इतकी मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (NCS) ही माहिती दिली आहे. मणीपूरच्या उखरुलमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 मोजली गेली. सकाळी 7.48 वाजता उसरूलपासून 56 किमी पूर्व-आग्नेयेला भूकंप झाला.
यापूर्वी गुरुवारीही मणिपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. सकाळी मोइरांगजवळ 3.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्याची खोली दक्षिण-आग्नेय 57 किलोमीटरपर्यंत होती. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीने सांगितले होते की, ‘रिश्टर स्केलवर 3.5 तीव्रतेचा भूकंप सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला होता.’ मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही