भाजपा आणि शिवसेना पुन्हा यांनी पुन्हा एकत्र येऊन काम केले पाहिजे. हे दोन पक्ष विभक्त झाल्याने त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्राच्या विकासावर होत आहे.” असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ते ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलत होते.
नारायण राणेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या “मी असतो तर कानाखाली वाजवली असती” या वक्तव्याबद्दल राणेंना अटक झाली. पण आता शिवसेना आणि भाजपमधील कटुता संपली पाहिजे.
आठवले म्हणाले की, “दोन मोठ्या पक्षांनी अशा प्रकारचे राडे करणं योग्य नाही. केंद्रीय मंत्री असलेल्या राणेंविरोधात अशाप्रकारे गुन्हा नोंदवणे अयोग्य आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केले पाहिजे.”
“देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली मला माहिती नाही. पण, यांच्यातील चर्चेमुळे सेना-भाजपा पुन्हा एकदा एकत्र येऊ शकतात. राणेंना अटक करण्याची शिवसेनेने घाई केली. राणे घाबरणारे नेते नाहीत. राणेंचं विधान घटनाविरोधी असेल तर शिवसेनेची वक्तव्यं देखील घटनाविरोधी आहेत.” असं आठवले यांनी म्हटलं आहे.