-मुख्यमंत्री ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, आज ११ वाजता तातडीची बैठक_
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. ठाकरेंचे मेहुणे श्रीधर माधव पाटणकर यांची 6. 45 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पुष्पक बुलियन प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्विट केले आहे.
ईडीने ठाण्यात आज सकाळी मोठी कारवाई केली. ठाण्यातील ‘नीलांबरी’ प्रकल्पातील ११ सदनिका हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीच्या आहेत. यानंतर या प्रकरणावर राज्यातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. आतापर्यंतची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या पाठीमागे ईडी लागली होती. पण आता ईडीचं टार्गेट ठाकरे आणि त्यांचे निकटवर्तीय आहेत.
मात्र यानंतर या सगळ्या पार्श्वभूमीवर दिवसेंदिवस महाराष्ट्रातला ईडीचा अॅक्टिव्हनेस पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सकाळी ११ वाजता कॅबिनेट बैठक बोलावली आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरावर आयकर विभागाने छापे मारले होते. एकंदरित दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांबाबत उद्या आयोजित केलेल्या कॅबीनेट बैठकीत चर्चेची शक्यता व्यक्त केली जात आहे.