महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजार राहावे, असे नोटीसमध्ये सांगितले गेले आहे.
अनिल परब यांना पाठवलेल्या नोटिसमध्ये कुठल्याही प्रकरणाचा उल्लेख नाही. केवळ मंगळवारी हजार राहणायचे आदेश दिले आहे. त्यामुळे यावर कायदेशीर सल्ला घेऊनच ईडीला उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यमुळे राणे यांची जनाशीर्वाद यात्रा रत्नागिरीत पोहचली असता पोलिसांनी त्यांना अटक केली होती. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना जामीन मंजूर केला होता, त्यानंतर राणे यांना मोठा दिलासा मिळाला होता. राणे यांची जनआशीर्वाद यात्रेचा समारोप होत असताना अनिल परब याना ईडीकडून नोटीस मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर ट्विटरवर प्रतिकिया दिली आहे.
शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र
असे म्हणत टोला लगावला आहे. मात्र कायदेशीर लढाई कायद्यानेच लढू, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला आहे.
ईडीने एक डेस्क ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे किंवा भारतीय जनता पक्षाने एक अधिकारी हा ईडीच्या कार्यालयात ऑफिसर म्हणून बसला आहे. त्याच्यामुळे हे सगळं होऊ शकता. नाहीतर भाजपला कसा कळलं कि अनिल परब याना नोटीस येतंय किंवा कोणत्या दिवशी त्यांना चौकशीला बोलावलं आहे. याची माहिती आम्हाला देखील नाही. किरीट सोमय्या, चंद्रकांत दादा पाटील यांना हे कसं कळत. ईडीचे नोटीस म्हणजे प्रेम पत्र आहेत. अनिल परब हे त्यांचे उत्तर द्यायला समर्थ आहे. ते रत्नागिरीचे पालकमंत्री आहे तसेच अनिल परब हे शिवसेनेचे आहेत, ते महत्वाचे. अशाने सरकार किंवा शिवसेना कमजोर होईल, वाकेल सरकाराला तडे जातील असे काहीही होणार नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.