इंदापूर: येथील शिक्षण विभागातर्फे
आज ४|९|२०२१ रोजी इंदापूरचे गटशिक्षणाधिकारी मा.राजकुमार बामणे, सणसर बिटचे विस्तार अधिकारी मा.दिलीप बोरकर, केंद्रप्रमुख मा मनोहर सांगळे, सणसरच्या मुख्याध्यापिकापद्मजा वाघमोडे व सणसर केंद्रातील सर्व आदरणीय शिक्षक बंधू भगिनींनी उपक्रमशील शिक्षिका, कवयित्री ‘नवांकुर’कार निर्मला मचाले-पवार यांचा शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला यथोचित सत्कार केला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील यशाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
निर्मला मचाले पवार यांच्या 'नवांकुर' या काव्यसंग्रहाचे नुकतेच लोकार्पण व साहित्य सेवा सन्मान-2021 प्राप्त झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठीचे शिलेदार बहुद्देशीय संस्था,नागपूरच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय सेवा सन्मान प्राप्त झाला होता. साहित्य क्षेत्रातील त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह काव्यरसिकांना लोकर्पण केला आहे.त्यांचे हायकू, चारोळी लेखण ही अतिशय प्रखर असेन नवोदितांसाठी प्रेरणा देणारे आहे.