सूतयज्ञ आंदोलनाला १५ पासून प्रारंभ होणार
नागपूर: ‘आनंदी खुशहाल हॅपी विदर्भ’च्या वतीने नागपूर कराराचे पालन न झाल्यामुळे विदर्भाचे आतोनात नुकसान झाले आहे व होत आहे. या कराराचे पालन होत
आहे अथवा नाही हे पाहाण्याची जबाबदारी केन्द्र सरकारची असल्यामुळे आम्ही मा. पंतप्रधानांना पत्र पाठवले होते की, आपण विदर्भातील लोकांच्या शिक्षणाचा खर्च केंद्र सरकाराने उचलावा व रोजगाराभीमूख शिक्षण पध्दती विदर्भात त्वरीत लागू करावी. असे वक्तव्य प्रदीप देशपांडे यांनी पत्रपरीषदेत केले.
ती जीवघेणी परीक्षा, नो होमवर्क, उच्च शिक्षीत शिक्षकाकडून शिक्षण, शिक्षण मंत्रालयाद्वारे शाळा कॉलेजचे संचालन/ इत्यादी फीनलँड पॅटर्नचा पण अभ्यास होऊ शकतो हे घटनेला धरूनच आहे. पण या पत्राचे उत्तर आले नाही म्हणून आम्ही विदर्भातील लोकांना मोफत शिक्षण व रोजगाराभीमूख शिक्षणासाठी एक आंदोलन करीत आहोत आम्ही कोणताही कायदा हातात घेणार नाही.
तर चरखा हातात घेऊन त्याचे सुत कातू त्याचे कापड बनवून मा. पंतप्रधानांना एक आनंदी विदर्भ जॅकेट बनवून देऊ. तसेच मा. मुख्यमंत्राना एक सदरा व टोपी व विदर्भातील आमदार खासदारांना टोप्या बनवून देऊ. याचे डिझाईन एका कमीटीद्वारे करण्यात येईल. या सुतयज्ञात सूत देऊन, खादीचे कापड देऊन किंवा कमीत कमी १ रू. देऊन सहभागी होता येईल या सर्वांची नांवे जाहीर करण्यात येतील. मुरलीधरजी काकडे यांच्या घरातून दि.१५.०२.२०२२ पासून नंतर प्रत्येकाच्या घरी व पूर्ण विदर्भात हा चरखा फिरवू व आधारासाठी गांधीजींची लाठी पण घेऊ. हेच आमचे ध्येय आहे. असे पत्र परिषदेत प्रदीप देशपांडे यांनी सांगीतले.
आनंदी खुशहाल हैप्पी विदर्भच्या वतीने पत्रपरिषदेत गणेश शर्मा, अनिलकुमार केशरवाली, मुरलीधर काकडे, शोभाताई सोनुले, रेखा निमजे, सतीश दत्तात्रय, किशोर कुर्वे, आशाताई वानखेडे, रोहित सोनुले, कविता लारोकर, रेखा मामर्डे आणि कवी तन्हा नागपुरी यावेळी उपस्थित होते.