उद्धव ठाकरे बरखास्तीची शिफारस देणार
मुंबई: शिवसेना व महाविकास आघाडीला भगदाड पाडणा-या एकनाथ शिंदेनी एकूण ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आहे. महेंद्र थोरवे ,भरत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराजे चौघुले, रमेश बोरणारे , तानाजी सावंत, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख ,प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय रायुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे ,विश्वनाथ भोईर, राजकुमार पटेल, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, प्रताप सरनाईक, प्रकाश अबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनावणे, यामिनी जाधव, बालाजी किनीकर अशी या आमदारांची नावे आहेत.
ठाकरे सरकार बरखास्त होणार का?
थोड्याच वेळात याचा फैसला होणार आहे. मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली आहे. व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहतील असे नाना पटोले यांनी म्हंटले होते. त्याप्रमाणे बैठक सुरु झाली आहे. तसेच एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण नाहीये असं म्हंटलय तर दुसरीकडे नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे कोरोनावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद होत असताना पाहायला मिळत आहेत.