गुवाहाटी: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील एक मराठी प्रसार माध्यमांशी फोनवरून संपर्क साधून आपली भूमिका मांडली. असे असतांना दरम्यान एक तासापूर्वी पोलीस बंदोबस्तात दोन-तीन आमदारांसोबत हॉटेल रेडिसनमधून शिंदे बाहेर पडले होते. मात्र, आता एक तास उलटूनही एकनाथ शिंदे हॉटेलमध्ये परतलेले नाहीत.
त्यामुळे एकनाथ शिंदे गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुठे गायब झाले आहेत. रेडीसन ब्ल्यू मध्ये हजर असलेल्या ४५ आमदारांनाही शिंदे कुठे गेले याबाबत माहिती नसल्याचे वृत्त समोर येत आहे. गुवाहाटीतून प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस बंदोबस्तात एकनाथ शिंदे हॉटेलमधून बाहेर पडले होते. मात्र अद्याप ते परतलेले नाहीत.
एकनाथ शिंदे सकाळपासून राजकीय नेत्यांच्या संपर्कात होते. सुरुवातीला असं सांगितलं गेली की गुवाहाटीमध्येच काहीतरी कामासाठी गेले आहेत. एकनाथ शिंदे मुंबई किंवा दिल्लीला गेले का? असा सवालही आता उपस्थित होत आहे. आतापर्यंत हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक आमदाराच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे स्वतः हजर राहायचे. मात्र, नुकतंच दिलीप लांडे यांनी हॉटेल रेडिसन ब्लूमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे इथे उपस्थित नव्हते. शिंदे गायब असल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.