युरोपियन युनियनच्या औषध नियामक विभागाने कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटशी दोन हात करणाऱ्या फायझरच्या कोविड गोळीला आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सदस्य राज्यांमध्ये फायझर कोविड गोळीच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सी युरोपियन युनियनसाठी औषधं उत्पादनांच्या मूल्यमापन आणि पर्यवेक्षणाची जबाबदार आहे.
फायझरच्या कोविड गोळीला अद्याप युरोपियन युनियनमध्ये वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, प्रौढांवर करण्यात येणाऱ्या कोरोना उपचारासाठी या गोळीचा वापर केला जाऊ शकतो, असे युरोपियन मेडिसिन एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, फायझरची कोविड गोळी ओमिक्रॉन व्हेरियंटवर प्रभावी असून, या गोळीचा वापर करुन रुग्णालयात दाखल होणारे रुग्ण आणि कोरोनाबळींची संख्या कमी करण्यास 90 टक्के परिणामकारक ठरेल असा दावा फायझर कंपनीने केला आहे.