1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

नागपूर जिल्ह्यातील कोराडीत साकारणार उर्जा शिक्षण पार्क; नितीन राऊत

Spread the love

कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात लोकांना वीज कशी तयार होते याची माहिती देणारा उर्जा पार्क साकारण्यात येणार आहे. या पार्कच्या माध्यमातून लोकांना विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण प्रक्रियेची संपूर्ण माहिती जाणून घेता येईल. सोबतच नागरिकांना वीज बचतीचा संदेशही दिला जाईल. या प्रकल्प निर्मितीसाठी 125 कोटी रुपये खर्च येणार असून प्रकल्प मंजूरीसाठी परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे आदेश राज्याचे उर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयात कोराडी उर्जाशिक्षण पार्क प्रकल्प निर्मिती संदर्भात कामकाजाचा आढावा राऊत यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. नासुप्रचे सभापती मनोजकुमार सुर्यवंशी, अधिक्षक अभियंता लिना उपाध्ये, वास्तुविशारद अशोक मोखा, कार्यकारी अभियंता प्रशांत भांडारकर यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिरात लाखो भक्तगण दर्शनाला येतात. याच परिसराला लागून असलेल्या औष्णिक विज निर्मिती केंद्राला पाहून लोकांच्या मनात वीज कशी तयार होते याचे कुतूहल निर्माण होते. येथील परिसरात महाउर्जा पार्क साकारल्याने नागरिकांना विजेचे उत्पादन, पारेषण व वितरण कश्या पध्दतीने होते या प्रक्रियेची संपूर्ण माहिती होईल. पर्यायाने यातून वीज बचतीचा संदेशही लोकांमध्ये पोहोचविला जाईल. यातून नागपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल तसेच रोजगाराच्या संधी सुद्धा उपलब्ध होईल. त्यामुळे उर्जा पार्क हा लोकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे व एक उत्तम पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्यासाठी नियोजनबध्द आराखडा तयार करुन परिपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर करावा, असे डॉ. राऊत यांनी सांगितले

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    जळगावात 53 हजार नागरिकांचे विक्रमी लसीकरण

    August 28th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजळगाव जिल्ह्यात आज एकाच दिवसात ५३ हजार लसीच्या मात्रा देण्याचा विक्रम नोंदवण्यात आला. लसीकरण मोहिमेतील आताप...

    एकनाथ शिंदेनी ४० आमदारासह गट केला स्थापन

    June 22nd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveउद्धव ठाकरे बरखास्तीची शिफारस देणार मुंबई: शिवसेना व महाविकास आघाडीला भगदाड पाडणा-या एकनाथ शिंदेनी एकूण ४० ...

    ‘महाराष्ट्रात पाव किलो ड्रग्ज शोधणाऱ्यांनी गुज...

    November 11th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोपांचे सामने ब...