महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये सध्या अतिवृष्टी, नुकसान भरपाई यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केला जात आहे. दरम्यान भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या महाविकास आघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. प्रत्येकवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे. या आघाडीतील नेते बायकोने जरी मारले तरी सांगतील कि, या मागे केंद्र सरकारचा हात आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी येथे देगलूर पोट-निवडणुकीसाठी उपस्थिती लावली. यावेळी आयोजित प्रचारसभेट ते म्हणाले की, या सरकारची प्रवृत्ती मिळेल त्यामध्ये खाऊ लागले आहेत. मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, पाच वर्षात एकाही शेतकऱ्यांचे विजेचे बिल आम्ही सत्तेत होतो तेव्हा कापले नाही. मात्र, या आघाडी सरकारने शेतकर्याना अंधारात ठेवले. महाराष्ट्र सरकारने दोन वर्षात शेतक-यांना एक फुटकी दमडीही दिली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केली आहे