राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते आणि मंत्र्यांवर सध्या ईडी, सीबीआय, आयकर विभाग आदी केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडसत्र सुरू आहे. धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं ततोडपाणी करणण्यासाठी सुरू असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
धाडी टाकायच्या, फोटो काढायचे आणि पेपरबाजी करायची, सध्या राज्यात हे सगळं सुरु आहे. पण सगळं झाल्यावर कुणालातरी शिक्षा झाली आहे का? एक दिवसाची जरी शिक्षा झाली असती तर आम्ही मानलं असतं. पण सगळं तोडपाणी करण्याकरता हे सगळं चाललं आहे. केवळ आपल्या पक्षात घेण्यासाठी मोदी सरकारकडून नेत्यांना भीती घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. करोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. कोविड लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
जगातील प्रत्येक देशाने कोविड लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मात्र लसीकरणाची ही जाहिरातबाजी मोदी सरकराने थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेकांनी यावरून मोदींचा फोटो काढवा अशी मागणी केली आहे. लसीकरण हा इव्हेंट नाही ती एक प्रक्रीया आहे. फोटो छापायचे आदेश कुणी दिली याची चौकशी व्हावी. यापुढे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करणार का? हे केंद्र सरकारने जाहीर करावे, असेही त्यांनी स्पष्ट