धर्म आणि सामाजिक दास्याच्या जोखडाने उध्वस्त झालेल्या माणसाला बाबासाहेबांच्या प्रयत्नाने मिळालेली सुखाची संधी व सुरक्षितता घोर संकटात आलेली आहे. हे संकटदास्य आर्थिक सत्तेच्या सापळ्यातून नव्याने येत आहे. आधीचे दास्य स्वीकारुन मरण होते. आताचे बळजबरीचे मरण राहणार आहे. हे भयंकर राहील. वेगवेगळ्या डावपेचांनी हा फास आवळल्या जात आहे. हे डावपेच समजून घेणे खरी गरज आहे. तेव्हाच नव्या आखणीचे निदान करता येईल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकरी विचारवंत रणजित मेश्राम यांनी केले.
ते प्रबुद्ध रंगभूमीच्या वतीने आयोजित ‘बुद्धिस्ट थिएटर’ धम्मचक्र विशेषांक तसेच भीमपुत्र टेक्सास गायकवाड लिखित ‘देशात ब्राम्हण पुरूषच हिंदू आहेत’ या पुस्तकांच्या प्रकाशन समारंभ व विचारमंथन या आयोजनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम ऊरुवेला काॅलनी स्थित आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे नुकताच पार पडला. सामाजिक कार्यकर्त्या ज्येष्ठ रंगकर्मी तक्षशिला वागधरे यांनी आयोजनाचे उदघाटन केले.
रणजित मेश्राम पुढे म्हणाले , प्रश्न सुटलेल्यांनी चळवळीचे सांगावे अन् प्रश्न असलेल्यांनी चळवळीत फारसे नसावे ही चिंताजनक स्थिती आहे. ही चिंताजनकता गंभीर होण्याआधी चळवळीची विश्वासार्हता वाढविण्याची फार गरज आहे. प्रारंभी भदन्त नागदीपांकर यांनी बुद्धवंदना केली. प्रबुद्ध नाट्यपरिषदेचे अध्यक्ष संजय सायरे यांनी आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रास्तविक मीनाक्षी बोरकर तर आभार मालती वराडे तसेच संचालन विलास गजभिये यांनी केले.
याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे , नॅशनल एज्युकेशन सोसायटीचे सचिव विजयराव भोयर , जेष्ठ्य नाट्य दिग्दर्शक शालिक जिल्हेकर यांची समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी डाॕ. निलकांत कुलसंगे , भुपेश वराडे,सिद्धार्थ गायधने, अरुण अडीकने, संजय वाघमारे, डाॕ. सुनंदाताई जुलमे, बोरकर , डाॕ. निलकांत कुलसंगे , सुभाष मानवटकर, माणिक खोब्रागडे, बिस्मार्क भिवगडे , विनायक इंगळे , प्रा. सुशिल मेश्राम , भोला सरवर, राहुल दहीकर, प्रा. डाॕ. प्रगती हरले-कुकडे, नागेश वाहुरवाघ, अविष्कार मुझिक अॕकेडमी चे सर्व कलावंत, संजय गोडघाटे , पराग बडवाई , भीमराव गायकवाड , भुपेश वराडे, जयपाल कांबळे, एस .वानखेडे, , सुगत रामटेके , विनोद मून, राजू नवनागे , आदी उपस्थित होते.