नागपूर/हिंगणा: विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प़कल्प अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना कान्होलीबारा व पंचायत समिती हिंगणा अंतर्गत पशु वंधत्व निवारण व रोगनिदान शिबिराचे नुकतेच यशस्वी आयोजन संपन्न झाले.
कान्होलीबारा येथील गावातील पशुपालकांनी आपली जनावरे औषधोपचार करण्यासाठी शिबिरात आणले होते. शिबिरात एकूण 202 जनावराचे औषधोपचार करण्यात आले. त्यापैकी एकूण 13 वंधत्वग्रस्त गायीवर उपचार करण्यात आले. आयोजित शिबिराचा पशुपालकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
या शिबिरात तज्ञाद्वारे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. पशुपालन, दुग्धपालन,समस्या वर चर्चा करण्यात आली. यात मोठ्या सख्येंने शेतक-यांनी सहभाग नोंदवला सदर शिबिरात प्रमुख पाहुणे उपसंरपच येलुरे, स़जय धोडरे उपस्थित होते. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ मंजूषा पुंडलिक प्रामुख्याने उपस्थित होत्या.
याप्रसंगी पशु उपचार तज्ञ डॉ सुजित तापस, डॉ विकास गावखरे, डॉ एन बी पाटील, डॉ घनबहादुर ,अमित तलमले, प्रवीण निखारे अमित रंगारी, सुरज गोखले, ठाकरे यांनी सहकार्य केले. मदर डेअरी कडून शेकोकार, ऐरिया मंनेजर शुभम आंबेकर याचेही अनुभवी मार्गदर्शन लाभले.
शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख रशीद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन आभार डॉ ऋचा लांजेवार यांनी केले . कान्होलीबारा, सावळी बिबी, चौकी, धौकुर्डा, वांरगा आजनगाव, देवळी पेंढरी, मातनी, कुकुर्डा, गेटवाई, काजळी, डेगमा खुर्द, पिपंळधरा, लखमापूर, गांधी खापरी, खडकी, किन्ही, भातचोली इत्यादी गावाचा समावेश होता .