शेतकरी बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. ४० शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने उद्या ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांना दिनांक २७ रोजी दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन अनेक महिने झाले सुरु आहे. तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या सरकारच्या मागणीवर ते सातत्याने ठाम आहेत. दिल्लीसह इतर ठिकाणी पण भारत बंद मोर्चामध्ये लोक सामील होऊन जोरदार प्रदर्शन करत आहेत.
शेतकऱ्यांनी जनतेला त्यांच्या बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेता पोलीस सर्व आवश्यक खबरदारी घेत आहेत. मात्र भारत बंदचा परिणाम दिल्लीवर होऊ नये म्हणून सीमांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चाने राजकीय पक्षांना भारत बंद मध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनीही त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
सोमवारी शेतकरी आंदोलनाला १० महिने पूर्ण होत आहेत. संयुक्त किसान मोर्चाचे आवाहन आहे की इतर विभागासह, विशेषत: कामगार, व्यापारी, वाहतूकदार, विद्यार्थी, तरुण आणि महिलांनी शेतकऱ्यांसोबत मोर्चात सामील व्हावे. सोमवारी सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.या काळात सर्व खाजगी आणि