कृषी कायद्यांचा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी गाजीपूर बॉर्डर नेशनल हायवे २४ येथील सर्विस लेन मार्ग खुला केला आहे. शेतकरी आंदोलन सुरु असल्यापासून एक वर्षाहून अधिक वेळेपासून हा हायवे बंद होता. ज्यामुळे दिल्ली येथील लोकांना ट्राफिकचा त्रास सहन करावा लागत असे. शेतकरी नेता राकेश टीकेत नेशनल हायवे २४ दिल्ली- गाजीपूर मुर्गा मंडी कडे जाणाऱ्या मार्ग खुला केला आहे. गाजीपुर बॉर्डर येथून शेतकरी उठले आहेत. शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे कि, हा मार्ग त्यांनी बंद केलेला नसून पोलिसांनी रोखून ठेवले होता. सर्विस लेन बंद असल्यामुळे हि संबंधित केस सुप्रीम कोर्ट मध्ये जाण्याचा विचार केला होता.
एकीकडे शेतकऱ्यांचे विरोध- प्रदर्शन सुरू होते तेव्हा सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याकरिता आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. जस्टीस संजय किशन कौल आणि जस्टीस एम एम सुंदरेश यांच्या अंतर्गत सुनावणी होणार होती. याच वेळेस शेतकऱ्यांकडून विनंती केली गेली होती कि, या केसच्या सुनावणी दोन आठवड्या नंतर होणार होती. शेतकऱ्यांकडून वकील दुष्यन्त दवे पैरवी होते आणि सरकार कडून जनरल तुषार मेहता होते. या वेळेस सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले की, नियम हे पहिलेच बनले आहेत आणि त्यानुसार रस्ता मार्गे अडवल्या जाऊ शकत नाही.