18 नेत्यांचा शपथविधी होणार
मुंबई: शिंदे -फडणवीस सरकार स्थापन होऊन ३० दिवसाहून अधिक काळ लोटल्यानंतर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी (09 ऑगस्ट) सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राजभवनात होऊ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळात किमान 15 मंत्र्यांचा समावेश केला जाऊ शकतो. मिळालेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची चर्चा असून त्यांचं प्रदेशाध्यक्ष पद आशिष शेलार यांच्याकडे जाऊ जाण्याची शक्यता आहे.
तसेच शिंदे गट आणि भाजपमधून काही नावे निश्चित झाली असून ज्या नेत्यांना फोन आला आहे ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. परंतु मंत्रिमंडळाच्या रेस मध्ये असलेले अब्दुल सत्तार यांना अद्यापही निरोप मिळाला नसून टीईटी घोटाळ्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.