नागपूर: एकनाथ संभाजी शिंदे. मूळ गाव : सातारा. ९ फेब्रुवारी १९६४ साली शिंदे यांचा जन्म झाला.
कट्टर शिवसैनिक आणि आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे घनिष्ट अशी ओळख असणारे एकनाथ शिंदे .
२०१९ ला सत्ता स्थापनेच्या वेळी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नांव चर्चेत होते. पण एन वेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झालेत आणि शिंदे यांचे नाव मागे पडले.
त्यावेळेस शिवसेनेत एकनाथ शिंदे नजरेआड झाले होते काय ?
आता महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती बघता शिंदे हे नवीन शिवसेना उभी करतात का ह्या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आहे.
नगरसेवकापासून ते कॅबिनेट मंत्र्यापर्यंत एकनाथ शिंदे यांचा प्रवास फारच कसा होता तेच जाणून घ्या.
एकनाथ संभाजी शिंदे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती, म्हणून शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले. लहान वयातच घराची जबाबदारी अंगावर पडल्यामुळे घर चालाव म्हणून त्यांना रिक्षा चालवावा लागला.
बाळासाहेब यांच्यापासून प्रभावित होऊन ते शिवसेनेचे कार्यरकर्ते झाले.
प्रथम शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि नंतर ठाणे महापालिकेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले.
१९८० पासून शिंदे यांनी शिवसेनेत काम करायाला सुरवात केली.
१९८० ते ९० च्या दशकात अनेक आंदोलनात भाग घेतला.
१९९७ – साली ठाणे महापालिकेचे तिकीट देण्यात आले. पहिलीच पारीत ते निवडून आले. ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते सुद्धा झाले.
धर्मवीर आनदं दिघेंशी चांगली घनिष्ठ मैत्री त्यांची झाली.
२००० साली एकनाथ संभाजी शिंदे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. २००० साली शिंदे त्यांच्या परिवारासोबत महाबळेश्वरला गेले असता तिथे तापोळा नदीत बुडून त्यांच्या २ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या डोळ्यासमोर हि वेदनादायी घटना घडली.
त्यांनतर खचून राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यावेळेस आनंद दिघे यांनी त्यांना आधार दिला.
२००४ साली विधानसभेची निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात ते निवडून आले.
२००४ पासून सलग चार वेळा कोपरी- पाच पाखाडीचे ते आमदार झाले.
२००५ – साली ठाणे जिल्हा प्रमुख झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा गुलाल त्यांना लागला.
२०१४ मध्ये ते विरोधी पक्ष नेते हि बनले.
२०१४ मध्ये फडणवीस सरकार मध्ये त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री पद होते .
२०१९ मध्ये शिंदे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी होती.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे नगर विकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद आला.
सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेकचे ४० आणि ८ अपक्ष आमदार आहेत. शिंदे हे महाराष्ट्रात नवीन शिवसेना उभारतातात कि काय हे पाहणे रोमांचिक ठरेल.