मात्र विद्यार्थ्याच्या लसीकरणाचे नियोजन काय?
राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने, राज्य सरकारने आता दिवाळीनंतर पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तिसऱ्या लाटेच्या धरतीवर अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाहिय, असं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. एकिकडे महाविद्यालये आणि पाचवीपासून पुढील वर्गांची शाळा सुरु करण्यात आली आहे, मात्र १८ वर्षाखालील मुलांचे आणि विद्यार्थ्याचे लसीकरण काय? १८ वर्षाखालील मुलांचे लसीकरणाचे कसे करणार? त्याचे नियोजन कसे होणार हा एक मोठा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
१८ वर्षाखालील मुलांचे लसीकरण कसे करणार?
राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळं दिवाळीनंतर पहिली ते चौथीची शाळा सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळं जरी राज्य शासनान एसओपी तयार केला, नियमावली केली तरी मुलांच्या लसीकरणाचे काय करायचे? मुंबईत काही दिवसांपूर्वी नायर रुग्णालयात १८ वर्षाखालील मुलांवर कोरोनाच्या लसीचा प्रयोग करण्यात आला. तो यशस्वी सुद्धा झाल्याचा दावा डॉक्टर करत आहेत. मात्र यावर अजून शंभर टक्के शिकामोर्तंब झालं नाहीय. त्यामुळं पालक सुद्धा १८ वर्षाखालील मुलांच्या लसीबाबत शंका उपस्थित करत आहेत. जरी शाळा सुरु झाल्या तरी, किती पालक आपल्या लहान मुलांना शाळेत पाठवतील हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. जरी पालिकेने आरोग्याची काळजी घेत, शाळा सुरु केल्या तरी सुद्धा लहान मुलांच लसीकरण होत नाहीय, तोपर्यंत पालक सुद्धा निर्धास्त होणार नाहीत.