मुंबई: एकीकडे उद्धव सरकार वेंटीलेटरवर आहे.महाविकास आघाडी सरकारच्या एकनाथ शिंदेनी बंडाची डोकेदुखी करून ठेवली तर दुसरीकडे काॅंग्रेसला मोठाधक्का बसला आहे. नुकतेच जयंत पाटील यांनी आमचे आमदार सेफ असल्याचे सांगितले.
तर कॉंग्रेस पक्षाचे पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीत पक्षाचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काल रात्रीपासूनच पक्षात त्यावरून धुसफूस सुरू होती. त्या वादावर तोडगा काढण्यासाठी पक्षाने ज्येष्ठ नेते कमलनाथ यांना निरीक्षक म्हणून मुंबईत पाठवले आहे. त्यासाठीची बैठक पक्षाने बोलविली होती. त्यासाठी आमदारांना संपर्क करण्यात येत असताना पाच आमदार नाॅट रिचेबल असल्याचे लक्षात आले. त्यांची नावे लवकरच समजतील.
अद्याप कोणते कॉंग्रेस नेते ‘गायब’ झालेत त्यांची नावे कळू शकली नाहीत.