1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

फडणवीसांच्या ‘जलयुक्त शिवार’मुळे मराठवाड्यात महापूर; पर्यावरण तज्ञांचा दावा

Spread the love

पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. राज्यात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. त्यानंतर गुलाब चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. गावं जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवत आहेत.

जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशीची मागणी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली आहे.

अतुल देऊळगावकर म्हणाले, “जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्यावेळेलाच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केलं जातं. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे”

Claim Free Bets

जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांची प्रतिक्रिया

ज्येष्ठ जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनीही मराठवाड्यातील पूरस्थितीच्या कारणांपैकी जलयुक्त शिवार एक कारण असल्याचं म्हटलं आहे.

मराठवाड्यात आलेला पूर जलयुक्त शिवार योजनेमुळे आला असं म्हणता येणार नाही, मात्र पूर येण्याला जलयुक्त शिवार योजना हे एक कारण आहे. जलयुक्त शिवार योजनेची कामं चुकीच्या पद्धतीने झाली. अतिखोलीकरण ,रुंदीकरण यामुळे कामात तांत्रिक चुका मोठ्या प्रमाणावर झाल्या. मी आधीपासूनच या कामांवर आक्षेप घेतला होता. मात्र सरकारने केलेल्या चुकांमुळे ही परिस्थिती उद्भवली, असं प्रदीप पुरंदरे म्हणाले. हवामान बदल ,नद्यांची वहनक्षमता कमी झाली, ही कारणं असली तरी पुराचं एक कारण जलयुक्त शिवार योजना हे सुद्धा आहे, असं जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणाले.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    अनिल देशमुख हाजीर हो..!! 16 नोव्हेंबरला कोर्टात हजर ...

    October 2nd, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली नवीन बातमी समोर येत आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात आता महान...

    कॉंग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्धार; नाना पटोले

    November 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveयेत्या काही काळात आता महापालिका निवडणुकांसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक येणार आहेत. या निवडणुकीत आघा...

    “उद्धव ठाकरेंना ‘लॉलीपॉप’ चिन्ह द्...

    July 29th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: शिवसेनेचे धनुष्यबाण हे जे चिन्ह आहे ते आत्ता उद्धव ठाकरेंना शोभणारं नाही. ते मवाळ आहेत. बिनकामाचे आह...