- “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ५ राज्यांची लोकनृत्ये आणि लोकगीतांचे सादरीकरण
- ७० लोक कलाकार विविध पारंपरिक लोकनृत्य आणि लोकगीते सादर करतील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, “शहीद भगतसिंह जयंती आणि राजा राम मोहन रॉय पुण्यतिथी” निमित्त “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत २७ आणि २८ सप्टेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ०४.०० वाजता “लोकनृत्य भारत भारती” चे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात ५ राज्यांतील ७० लोक कलाकार विविध पारंपरिक लोकनृत्ये आणि लोकगीतांचे सादरीकरण करतील. हा कार्यक्रम खालील YouTube लिंक वर कार्यक्रम पाहू शकता. तसेच या कार्यक्रमाची लिंक सर्वांकरीता फेसबुक आणि ट्विटरवर उपलब्ध असेल.
https://www.youtube.com/user/sczcc
२७ सप्टेंबर, २०२१ रोजी शाहीर अवधूत विभूते आणि समूह यांचे पोवाडा गायन (महाराष्ट्र), रवी कुनर आणि समूह यांचे भांगडा (पंजाब), अनिल कोळेकर यांचे धनगरी गजा (महाराष्ट्र) आणि समूह, साईला नृत्य (मध्य प्रदेश), पतिराम मार्को आणि गट), श्यामा सुंदरा राव आणि समूह थापेतागुलु (आंध्र प्रदेश) आणि एस. मथुरी नृत्य (तेलंगणा) महेंद्र यादव आणि समूह सादर करेल.
२८ सप्टेंबर २०२१ रोजी शाहीर अवधूत विभूते आणि समूह यांचे पोवाडा गायन (महाराष्ट्र), रवी कुनर आणि समूह यांचे भांगडा (पंजाब), अनिल कोळेकर आणि समूह यांचे लेझीम (महाराष्ट्र), पतिराम मार्को यांचे कर्मा नृत्य (मध्य प्रदेश), श्यामा सुंदरा राव आणि गट दप्पू नृत्य (आंध्र प्रदेश), एस. बोनालू नृत्य (तेलंगणा) महेंद्र यादव आणि समूह सादर करेल.