राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांन आजा पुन्हा एक पत्रकार परिषद घेत भाजपवर आरोप केला आहे. मलिकांच्या या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या माजी मंत्र्याने मंदिराच्या नावाने जमीन हडपली असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.
क्लिन अप अंतर्गत मंदिर, मस्जिद आणि दर्गाहच्या जमीन हडपली आहेत ते बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं जमिनी हडप केल्या आहेत. ईश्वराच्या नावावर, अल्लाहच्या नावावर दिलेल्या जमिनी हडपण्यात आल्या. ती प्रकरणं बाहेर काढणार आहे. भाजपच्या माजी मंत्र्यानं कसे शेकडो कोटी हडपले ते बाहेर काढणार आहे. जे अधिकारी या भ्रमात आहेत की नवाब मलिक घाबरू शकतात मी त्यांना सांगू शकतो की मी या प्रकरणाच्या शेवटापर्यंत जाणार आहे, असं मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, पुण्यातील एंडोवमेंट ट्रस्टनं बनावट कागदपत्र दाखवत एमआयडीसीत जमीन घेतली होती. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे. ईडीच्या एंन्ट्रीचं स्वागत आहे. वक्फ बोर्डात आम्ही क्लिनअप अभियान सुरु केलं, असंही नवाब मलिक म्हणाले आहेत.