नागपूर: केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने बुधवारी घोषणा केली कि, देशात भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआई) कडून संरक्षण मिळालेले सर्व स्मारक आणि स्थळे येथे ५ ते १५ ऑगस्टपर्यंत प्रवेश निःशुल्क राहील. हे भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे ” आझादी का अमृत महोत्सव” कार्यक्रमाचा एक भाग म्हणून करण्यात येत आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी ट्विट केले कि, ” आझादी का अमृत महोत्सव” आणि ७५ वा स्वतंत्र दिवस समारंभला बघता एएसआईने ५ ते १५ ऑगस्टपर्यंत संरक्षण मिळालेले सर्व स्मारक आणि स्थळांमध्ये प्रवेश निशुल्क राहील. तसेच “हर घर तिरंगा” कार्यक्रमाच्या आयोजनाचे आवाहन केले आहे. बीजेपी ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत हा कार्यक्रम चालविणार आहे.
या अभियानांतर्गत 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट या कालावधीत देशाच्या प्रत्येक भागात तिरंगा यात्रा काढून देशभक्तीचे वातावरण निर्माण केले जाणार आहे. यासोबतच हाट-बाजार आणि इतर सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्याचेही नियोजन आहे. 20 कोटींहून अधिक कुटुंबांनी तिरंगा फडकावण्याचे पक्षाचे लक्ष्य आहे.