केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्या प्रकरणीचा मुद्दा चांगलाच चघळला आहे. काल याच प्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. पण नंतर महाडमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. मात्र, ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.
जामिनिवर सुटका झाल्यानंतर काही तासात राणेंनी पाहिलं ट्विट केलं. केवळ दोन शब्दात ‘सत्यमेव जयते’ असं ट्विट त्यांनी केला.
तसेच त्यांच्या मुलगा नितीश राणे यांनी देखील मनोज वाजपेयी च्या सॅनेमातील डायलॉग ट्विट केला आहे. याविषयावर विविध पक्ष , कार्यकर्ते, व लोक ट्विटरवर मीम्स शेअर करत आहेत.