1. Doha bound IndiGo flight diverted to Pakistan's Karachi due to a medical emergency onboard. 2. 'Naatu Naatu' from RRR wins the Oscar for the Best Original Song. 3. India's 'The Elephant Whisperers' wins Oscar award for the Best Documentary Short 1. मुंबई : कमला नगरमधील झोपडपट्टीत लागली भीषण आग.  2. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर 'फीडबॅक युनिट' या कथित स्नूपिंग प्रकरणात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत खटला चालवण्यास गृह मंत्रालयाने दिली मंजुरी. 3. हरित ऊर्जेला मुख्य प्राधान्य देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयामुळे खुश आहे: डेन्मार्कचे एन्व्हॉय.

G-20 परिषदेला आजपासून सुरुवात, नारायण राणेंनी केले उद्घाटन

Narayan Rane

नागपूर: जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप (IWG) ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे.

या बैठकीत सहभागी होणारे देश आणि संस्था पायाभूत सुविधांमधील गुंतवणुकीच्या विविध पैलूंवर विचारमंथन करतील. (G-20 summit begins today in Pune)

IWG सदस्य राष्ट्रे, अतिथी राष्ट्रे आणि भारताने आमंत्रित केलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे ६५ प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. यादरम्यान ते भारताच्या जी-20 अध्यक्षतेखाली २०२३ च्या पायाभूत सुविधांच्या अजेंडावर चर्चा करतील.

नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. नारायण राणे म्हणाले, “मी स्वतःला भाग्यशाली समजतो की ही जी 20 ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्याचे उद्घाटन माझ्या हाताने झाले. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धनयवाद देतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश प्रगती करत आहे. जगातील शहरातील विकास कसा होईल याच्यावर ही परिषद आहे. पुणे, मुंबई, नागपूर ही शहरं जगात आकर्षण ठरत आहेत.”

“शहरांचे स्वरूप कसे असावे याचे मार्गदर्शन या परिषदेमधून मिळेल आणि याला केंद्र सरकार, राज्य सरकार निधी उपलब्ध करुन देतील. तसेच महाराष्ट्र प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सरकार बदलले की निर्णय बदलतात, या मताशी मी सहमत नाही, मी ३२ वर्ष मंत्री होतो, निर्णय बदलत नाहीत तर दृष्टिकोन बदलतो”, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत. यावर देखील नारायण राणे यांनी भाष्य केले. कोणतेही उद्योग बाहेर जात नाही आहेत. या मिस गाईड करणाऱ्या बातम्या आहेत. जे राज्य करात सवलत देतात. तिथे बाहेरच्या कंपन्या येऊन गुंतवणूक करतात. देशाच्या इतर भागापेक्षा जागेचे दर महाराष्ट्रात महाग आहेत. त्यामुळे उद्योग महाराष्ट्रातून बाहेर जातात पण ते परत येतात. माझ्या जवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रिपद आहे. उद्योग महाराष्ट्रात आणण्याकरीता केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. रोजगार देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. २०० कोटीचा ट्रेनिंग प्रोग्राम पुण्यात येईल, असे नारायण राणे यांनी सांगितले.

 

RENUKA KINHEKAR

RENUKA KINHEKAR

All Posts

Latest News

“Cloud & Metaverse Summit 2023”; तं...

February 25th, 2023 International

Related Post

चेन्नईत ‘जल प्रलय’, 14 जणांचा मृत्यू;

November 12th, 2021 | RAHUL PATIL

सरकार अपयशी, सरकारविरोधात लोकांचा संताप तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे लोक भीतीच्या वातावरणात जगत आहेत. डिसेंबर 2015 मध्...

‘त्‍यांना’ सरकार पडणार या स् ...

July 30th, 2022 | RAHUL PATIL

मुंबई- आम्‍हाला दोन तृतीयांश बहुमत आहे. १६६ आमदारांचा पाठिंबा आहे. त्‍यामुळे आमचे सरकार पडणार, हे संजय राऊत ...

भारतीय व्यापाराला हजारो कोटीचा फटका, आयात – नि...

September 7th, 2021 | RAHUL PATIL

तब्बल 20 वर्षांनंतर तालिबान्यांनी पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगा...