1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

बंडखोर शिंदेसह १६ जणांच्या आमदारकीवर येणार गंडातर?

eknath-shinde-thefreemedia
Spread the love

मुंबई: शिवसेनेची विधी विभागाची एक टीम आता विधानभवनात पोहोचली आहे. १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिलं जाणार असून, आता उपाध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य काय? एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय असणार? भाजपच्या गोटात काय चाललंय, या आणि अशा प्रश्नांनी राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आमदारांनी शिवसेनेला आव्हान दिल्यानंतर आता ‘मातोश्री’वर घडामोडी सुरूये. त्यातच आता शिवसेनेनं १६ बंडखोरांचं सदस्यत्व करण्याची शिफारस केली आहे.

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात राजकीय वर्तुळ हादरलं. शिवसेना आमदारांचा एक मोठा गट घेऊन एकनाथ शिंदे सुरतला पोहोचले. त्यानंतर सर्व आमदारांना गुवाहाटीला देण्यात आलं. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक आमदार गुवाहाटीत जाऊन पोहोचले आहेत.

अचानक झालेल्या या बंडानंतर आता शिवसेनेनं बंडखोर आमदारांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना सुरुवातीला १२ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेनेनं त्यात आणखी चार जणांची नावं जोडली आहे. त्यामुळे एकूण १६ जणांची आमदारकी रद्द करण्याची शिफारस शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

Claim Free Bets
    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    एअर इंडियाला आता टाटांची ताकद; 68 वर्षानंतर पुन्हा ट...

    October 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveएअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकी...

    जुन्या नोटा नाणी विक्री, खरेदीवर रिझर्व बँकेकडून इशारा

    November 1st, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveगेले काही दिवस ऑनलाईन आणि ऑफलाईन वर जुन्या नोटा, नाणी विकून भरपूर पैसे मिळविण्याच्या जाहिराती सातत्याने येत...

    आश्चर्यम…!! फरार परमबीर सिंग यांचा ठावठिकाणा ग...

    September 24th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबईचे माजी पोलीस आयुक्त मागील अनेक दिवसांपासून फरार आहेत. त्यांचा अटक वारंट महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तच...